दहाव्या मजल्यावरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू

बांधकाम साईटवरील घटना; ठेकेदारावर गुन्हा

पिंपरी – बांधकाम साईटवर काम करताना दहाव्या मजल्यावरुन पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. 16 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काळेवाडी येथे घडली. सुरक्षेचे साहित्य न पुरवून कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहाबन अली सय्यदअली (वय-19 रा. काळेवाडी) असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नितीन जगताप यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन दिनेश कुशवाह (वय-33 रा. थेरगाव) या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, जे. एन बिल्डर यांची काळेवाडी येथील विजयनगर येथे “आदी अम्मा ब्लीस’ ही बांधकाम साईट सुरू आहे. या बांधकाम साईटवर गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शहाबन अली सय्यद अली हा काम करीत असताना दहाव्या मजल्यावरुन खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या बांधकाम साईटवर ठेकेदार दिनेश कुशवाह यांनी बिल्डींगच्या चारही बाजूला संरक्षक जाळी लावलेली नव्हती. कामगारांना हेल्मेटही न देता कामगारांना पुरेसी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नव्हती. यामुळे सय्यदअली याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कुशवाह याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. मडके हे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)