संसदेत ‘धार्मिक घोषणा’ नको – प्रकाश आंबेडकर

नवी दिल्ली – संसदेत कोणत्याही धर्माच्या घोषणा नको. मग अल्लाहू अकबर असो वा जय श्रीराम असो… संसदेत धार्मिक घोषणा कशाला?? असं भूमिका भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.

दरम्यान, संसदभवनामध्ये (एमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे नवनिर्वाचित खासदार शपथ ग्रहणासाठी पुढे आले असता संसदेमध्ये उपस्थित असलेल्या भाजप खासदारांनी ‘जय श्रीराम’ असा जयघोष करीत स्वागत केले होते. यावर प्रतिक्रिया देत शपथ ग्रहण करणाऱ्या ओवेसीकडून अल्लाहू अकबर घोषणाही करण्यात आल्या होत्या. या घटनेवर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका मांडली आहे. संसदेत घोषणाबाजी न होता कामकाज व्यवस्थितपणे आणि सुरळितपणे चाललं पाहिजे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घोषणाबाजीपेक्षा महत्वाचे आहेत,संसदेचे पावित्र्य सत्ताधाऱ्यांनी जपायला हवे. मात्र तसं कृत्य सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसत नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here