पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जाणार अमेरिका दौऱ्यावर

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि अमेरिका या दोन्ही देशांतील संबंध सुधारावेत यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता पुढाकार घेतला आहे. येत्या 22 जुलै रोजी इम्रान खान हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत या भेटती चर्चा होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान या दोघांची भेट होणार असल्यासंदर्भातले एक पत्र व्हाईट हाऊसतर्फे जारी करण्यात आले असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

दोन्ही देशांमधली शांतता, स्थैर्य आणि आर्थिक मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे दहशतवादाचा नायनाट करणे, सुरक्षा, व्यापार या विषयांवरही चर्चा होणार असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनीही या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)