पाकिस्तानकडून भारतासाठी 14 जूनपर्यंत हवाई हद्द बंदच

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्यासाठी भारतावरील बंदीची मुदत पाकिस्तानने 14 जूनपर्यंत वाढवली आहे. पाकिस्तानी नागरी हवाई वाहतुक प्राधिकरणाच्या प्रवक्‍त्याने ही माहिती पाकमधील माध्यमांना दिली आहे. भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला बालाकोटमधील जैश ए मोहम्मद संघटनेच्या अड्डयावर केलेल्या “एअर स्ट्राईक’नंतर पाकिस्तानने संपूर्ण पूर्व भागातील हवाई हद्द बंद केली होती. मार्च महिन्यात ही बंदी पाकिस्तानने अंशतः कमी केली. भारतीय विमानांना या हवाई हद्दीच्या वापराबाबतची बंदी मात्र कायम ठेवण्यात आली होती.

एप्रिल महिन्यात पाकिस्तानने या हवाई हद्दीतील आणखी 11 हवाई मार्ग भारतातून पश्‍चिमेकडील देशांमध्येसाठी जाणाऱ्या विमानांसाठी खुले केले. तेंव्हापासून एअर इंडिया आणि तुर्किश एअरलाईन्सची विमानसेवा या हवाई मार्गावरून सुरू झाली होती. मात्र भारतात येणाऱ्या विदेशी विमानकंपन्यांना लांबच्या मार्गाने यावे लागत होते. युरोपियन किंवा दक्षिण पूर्वेकडील विमानांना हा लांबचा मार्ग तोट्याचा ठरत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)