जम्मू काश्मीरमधील चकमकीत 2 दहशतवादी ठार

श्रीनगर- जम्मू काश्‍मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर भागात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये दोन अज्ञात दहशतवादी मारले गेले. या दहशतवाद्यांबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिसांनी सोपोरमधील दांगेरपोरा भागाची नाकाबंदी करून शोधमोहिम सुरू केली होती. या भागात लपून राहिलेल्या दोन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यावर चकमकीला सुरुवात झाली. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये दोन्ही दहशतवादी ठार झाले, असे पोलिसांच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

या दोन्ही दहशतवांचे मृतदेह घटनास्थळावरून आणण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दहशतवाद्यांकडून काही शस्त्रे आणि दारुगोळ्यासह काही गुन्हेगारी साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.