‘त्या’ वक्तव्यावरून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश

प्रातिनिधिक छायाचित्र

भोपाळ – भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. साध्वी प्रज्ञा सिंग यांनी परवा मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये वीर मरण प्राप्त झालेल्या हेमंत करकरे यांच्याबाबत अशोभनीय वक्तव्य केलं होतं.

यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा एका दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर मी आयोध्येतील ती इमारत पाडण्यात सहभागी होते आणि तेथे राम मंदिर उभारण्यासाठी देखील उपस्थित राहील, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

यापूर्वी, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या या वक्तव्यावरून भोपाळच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना या वक्तव्याबाबत एका दिवसाच्या आत खुलासा करावा असे आदेश दिले होते. मात्र साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी याबाबत ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)