टेंपोच्या अपघातात एकजण ठार

जामखेड: तालुक्‍यातील जातेगाव रोडवर के.के बेन्जो या पथकाचा टेम्पो उलटून बॅण्ड मास्तर किशोर गुलाब गायकवाड (वय 45) रा. तेलंगशी ता. जामखेड या इसमाचा या गाडीखाली दबून मृत्यू झाला. तर या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. तेलंगशी येथून के.के. पथकाचे मालक किशोर जावळे हे आपल्या बॅण्ड पथकासह लग्नाची सुपारी वाजविण्यासाठी आपल्या पथकाला घेऊन खर्डा येथे लग्नासाठी निघाले होते.

सदर गाडी बुधवारी (दि.12) खर्डा रोडवरील तेलंगशी फाटा या ठिकाणी आली असता, त्याठिकाणी पैठण पंढरपूर या सिमेंट रस्त्याचे काम चालू असल्याने, चालकाने गाडी खाली उतरवली. याचवेळी गाडीवरील ताबा सुटल्याने बेन्जोची गाडी पल्टी होऊन गाडीला अपघात झाला. त्यामध्ये किशोर गुलाब गायकवाड (वय-45) यांचा या गाडीखाली दबून दुर्दैवी मृत्यु झाला. तर त्यासोबत असणारा त्याचा भाऊ विनोद गुलाब गायकवाड गंभीर जखमी झाला आहे. इतर प्रवीण जायभाय, दादू गायकवाड, वंदना गायकवाड या किरकोळ जखमींना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्या पथकाने भेट दिली असून, पुढील तपास करीत आहेत. लग्न सराईच्या घाई गडबडीत हा दुर्दैवी अपघात झाला असावा, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)