हैदराबाद – ऑटो क्षेत्रात कार्यरत असणारी महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनी लवकरच आपली 50 इलेक्ट्रिक वाहने उबरच्या प्लॅटफॉर्मवर उतरवणार असल्याची घोषणा केली आहे. ही सेवा देशातील विविध शहरांमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
उबरच्या माध्यमातून जिथे मागणी तिथे सेवा या संकल्पनेतून ही वाहने रस्त्यावर धावणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. महिंद्राची इलेक्ट्रिक वाहने उबरच्या प्लॅटफॉर्मवर आल्यावर पर्यावरणातील समतोल राखण्यास मदत होणार आहे.