देहुरोड -घरगुती कारणांवरून मुलीचे जावयाची भांडण झाले. या सततच्या भांडणाचा मनात राग धरून सासू-सासऱ्यांनी जावयाला बदडून काढले. धायरी, गारमाळ येथे 25 एप्रिल रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी आकाश यशवंत जालगी (वय 31, रा. गारमाळ, धायरी) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सासरे महेश गोविंद येलगुंडी, सासू यशोदा महेश येलगुंडी आणि चुलत सासरे पांडुरंग येलगुंडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.