Raj Thackeray | Lok Sabha Election 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आज शनिवारी राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही करणार असल्याचे जाहीर केले आहे.
आज मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांसमोर त्यांच्याकडून याबाबतची माहिती देण्यात आली. । Raj Thackeray | Lok Sabha Election 2024
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महायुतीला प्रचारात सहकार्य करायचे की नाही, यासंदर्भातील बैठक घेतली. या बैठकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचारात सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, 2014 च्या आधीच भूमिका ही निवडून आल्यावर तिकडे बदलू शकते तर मलाही भूमिका बदलणे आवश्यक होते.
सगळे म्हणतात, राज ठाकरेंनी भूमिका बदलली पण याला भूमिका बदलणे म्हणत नाहीत, तर धोरणांवर टीका करणे म्हणतात, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे.
महाराष्ट्रासाठी आमच्या काही मागण्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यापासून ते गड किल्ल्यांचे संवर्धन असे अनेक विषय आहे. यात अनेक गोष्टी असतात.
औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र पुढारला आहे. उद्योगपतींकडून प्राधान्य देण्यात येणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मोदींना सर्व राज्य मुलांसारखे समान असले पाहिजे. त्यांना गुजरात प्रिय असणे स्वाभाविक आहे.
कारण ते गुजरातचे आहे. पाच वर्षात ते सर्व राज्यांना समान पाहतील ही अपेक्षा आहे. त्यांना आज पाठिंबा दिला आहे. त्यासाठीच आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली, असे राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले. । । Raj Thackeray | Lok Sabha Election 2024