येरवडा – टिंगरेनगर फाईव्ह नाईन चौक येथील एमइएम कॉलनीतल्या चेंबरमध्ये गाय पडली होती. या गायीला अग्निशमनच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढून जीवदान दिले. टिंगरेनगर फाईव्ह नाईन चौक येथील एमइएस कॉलनी येथे मोठे चेंबरमध्ये गाय पडल्याची माहिती अग्निशमन जवानांना सकाळी 8.30 ला मिळाली.
त्यांनतर दलाचे जवान आणि स्थानिक नागरिक यांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर दोर, बांबू यांच्या साहाय्याने त्या गायीला चेंबरमधून सुखरूपपणे बाहेर काढले. अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी सुभाष जाधव, श्री. तांडेल, महेश मुळीक, राजाराम केदारी, फायरमन नवनाथ वायकर, उमेश डगळे, श्री. साबळे, गणेश पराते तसेच स्थानिक नागरिक गोरक्ष लोंढे, सुशांत साठे, विक्रम भोसले यांनी यांनी मदत केली.