मुंबईतील मुक्काम हलवला; कर्नाटक आमदार विधान सौध अध्यक्षांच्या भेटीसाठी बंगळुरूकडे रवाना

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आज कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेसचे राजीनामा सादर केलेले १६ आमदार बंगळुरूकडे रवाना झाले आहेत. आज सकाळीच सर्वोच्च न्यायालयाने राजीनामा फेटाळण्यात आलेल्या आमदारांना आज सायंकाळी ६ वाजता कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले राजीनामे सादर करण्याची परवानगी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राजीनामा सादर करून मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामी थांबलेल्या आमदारांनी आपला मुक्काम हलवला असून ते दुपारच्या विमानाने बंगळुरूकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान, जेडीएस-काँग्रेस आघाडीचे आमदार आज सायंकाळी ६ वाजता बंगळुरूतील ‘विधान सौध’ येथे आपले राजीनामे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्याकडे सादर करण्यासाठी येणार असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्याचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी व काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांनी जातीने विधान सौध परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आहे. विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सादर करण्यासाठी येणारे आमदार आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)