बदनामीकारक पोस्ट बद्दल जिग्नेश मेवानींच्या विरोधात गुन्हा

अहमदाबाद – गुजरात मधील वलसाड येथील एका शाळेच्या संबंधात खोटा व्हिडीओ सोशल मिडीयात प्रसारीत करून शाळेची बदनामी केल्याच्या प्रकरणात अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शाळेच्या प्राचार्य विजलकुमारी पटेल यांनी तक्रार दिली होती.

अर्धनग्न शाळकरी मुलीला कोणीतरी बेदम मारत असल्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता. पण हा व्हिडीओ त्या शाळेशी संबंधीत नव्हताच. आरएमव्हीएम शाळेतील अमानुष प्रकार असे संबोधत मेवानी यांनी तो व्हिडीओ पोस्ट केला होता. व हा व्हिडीओ सर्वत्र शेअर करून या प्रकाराचा जितका शक्‍य होईल तितका निषेध करा असे आवाहन आमदारांनी केले होते.

पण दुसऱ्याच कोणत्यातरी ठिकाणचा व्हिडीओ आमच्या शाळेच्या नावाने प्रसारीत करून आमच्या शाळेची बदनामी केली असा दावा त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने करीत आमदार मेवानीच्या विरोधात पोलिस तक्रार दिली. त्यानंतर मेवानी यांनी हा व्हिडीओ डिलीट केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)