गयानाच्या विमानतळावर विमानाचे क्रॅश लॅन्डिंग

जिऑर्जटाऊन – गयानाची राजधानी जॉर्जटाऊनच्या विमानतळावर आज एक बोईंग जेटलायनर विमान क्रॅश लॅन्ड झाले. या अपघातामध्ये 6 प्रवासी जखमी झाले असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले. “द फ्लाय जमैका एअरवेज’चे हे विमान टोरोंटो येथे जात होते.

मात्र उड्डाण केल्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये विमानात हवेच्या दाबाशी संबंधित तांत्रिक समस्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हे विमान पुन्हा विमानतळावर परतले. धावपट्टीवर उतरत असताना विमानाची दिशा चुकली आणि ते थोड्या अंतरापर्यंत भरकटले. त्यामुळे विमानाच्या चाकांचे आणि पंखांचे नुकसान झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र सुदैवाने विमान धावपट्टीवर टेकलेले होते आणि विमानाच्या इंजिनाला धोका नव्हता. त्यामुळे आग लागली नाही. त्यामुळे विमानातील प्रवाशांच्या जिवीताला धोका उत्पन्न झाला नाही, असे परिवहन मंत्री डेव्हिड पॅट्टरसन यांनी सांगितले. या विमानामध्ये 126 प्रवासी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)