पुण्यातील दुर्घटनेची चौकशी करा; मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

पुणे – हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

दरम्यान, दुर्घटनेबाबत चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नियमानुसार शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असेही ही त्यांनी सांगितले.

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मदत कार्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.कोंढवा येथील दूर्घटनेवरून प्रथमदर्शनी असे लक्षात येते की बांधकाम मजुरांसाठी जी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, ती सुरक्षित नव्हती. जिल्हा प्रशासनाकडे या बांधकामविषयक सर्व माहिती उपलब्ध असून त्याची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here