पुण्याभोवती हवा प्रदूषणाचा फास घट्ट

एप्रिलमध्ये नायट्रोजन ऑक्‍साईड प्रमाणाबाहेर : “पीएम-10′ सूक्ष्म धुलिकणांनीही भरीस भर

पुणे – हवेतील प्रदूषणकारी घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “पीएम10′ या घटकाबरोबरच नायट्रोजन ऑक्‍साईड या घटकाचे प्रमाणही धोकादायकरित्या वाढत आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार एप्रिलमध्ये हवेतील नायट्रोजन ऑक्‍साईडचे प्रमाण नियोजित प्रमाणापेक्षा 48 क्‍युबिक मीटरने जास्त असल्याची निदर्शनात आले आहे.

शहरातील हवेचे प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. शहरातील हवेमध्ये असणारे “पीएम-10′ अर्थात पर्टिक्‍युलेट मॅटर सूक्ष्म धुलिकण हे प्रमाणापेक्षा 2 टक्‍क्‍यांनी जास्त असल्याचे विविध अहवालांतून समोर आले आहे. असे असतानाच आता नायट्रोजन ऑक्‍साईड या हानीकारक घटकाचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. मंडळाच्या प्रमाणानुसार हवेतील नायट्रोजन ऑक्‍साईडचे प्रमाण 80 क्‍युबिक मीटर असणे आवश्‍यक आहे. मात्र एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या नोंदीनुसार या घटकाचे प्रमाण तब्बल 128 इतके नोंदविण्यात आले आहे.

नायट्रोजन ऑक्‍साईडचा मुख्य स्रोत हा वाहनांमधील इंधन हे असले तरी तापमानातील वाढ हे देखील नायट्रोजन ऑक्‍साईड वाढण्याचे एक प्रमुख कारण असते. गेल्या दोन आठवड्यामध्ये शहरातील तापमानामध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळेही हे प्रमाण वाढले असल्याचे मत विविध तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये श्‍वसनाचे, त्वचेचे विकार यांचा समावेश आहे. मात्र ही तर केवळ वरवरची समस्या आहे. हवाप्रदूषण रोखण्यासंदर्भात तातडीने उपाय न केल्यास याहीपेक्षा भयंकर परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागेल. त्यामुळेच हवा प्रदूषण ही समस्या गांभीर्याने घेतली पाहिजे.

अंमलबजावणी कागदावरच
हवेचे प्रदूषण रोखण्याबाबतचे धोरण, उपायांची अंमलबजावणी हे केवळ कागदी असून प्रत्यक्षात त्यांच्या अंमलबजावणीमध्ये आतापर्यंत मोठे दुर्लक्ष झाले आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी विविध पातळींवर एकत्रित आणि तत्पर उपाययोजना करणे आवश्‍यक आहे असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)