इराणच्या बाबतीत युरोपियन राष्ट्रांचा अमेरिकेला थंडा प्रतिसाद

लक्‍झेंमबर्ग – गेल्या आठवड्यात आखातात दोन इंधन टॅंकरवर झालेल्या हल्ल्याला अमेरिकेने इराणला जबाबदार धरून त्यांच्या विरोधात मोठ्या कारवाईची अपेक्षा व्यक्त केली पण त्यांच्या या प्रस्तावाला युरोपियन राष्ट्रांनी मात्र थंडा प्रतिसाद दिला आहे. इराणच्या विरोधात युद्धखोरीची भाषा वापरून वातावरण तापवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना साथ न देण्याचीच भूमिका युरोपियन राष्ट्रांनी घेतल्याने अमेरिका आता या प्रकरणात एकटी पडत चालली असल्याचे चित्र आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झाले आहे.

ओमान आखातात दोन इंधन टॅंकर्सवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर संयुक्तराष्ट्रांनी तणाव निवळण्यासाठी पुढकार घेतला आहे. त्या संबंधात युरोपियन राष्ट्रांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस अन्टेनिओ गुटेरेस हे लक्‍झेंमबर्गला आले आहेत. त्यावेळी त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करण्याचा प्रस्ताव ठेवला त्याला युरोपियन देशांनी पुर्ण पाठिंबा दिला.

या हल्ल्याला इराणच जबाबदार असल्याचा निष्कर्ष अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला आहे त्यांच्या या निष्कर्षाला ब्रिटनने पाठिंबा दिला आहे पण अन्य युरोपियन देशांनी मात्र या प्रकाराची आधी निष्पक्ष चौकशी करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. जर्मनीचे विदेश मंत्री हेईको मास यांनी पत्रकारांना सांगितले की अमेरिका आणि ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांचा अहवाल काय असेल हे अगदी स्पष्ट होते. पण त्यांच्या माहितीची खातरजमा करण्याला आम्ही महत्व देतो. या प्रकरणात अत्यंत काळजीपुर्वकच पावले टाकली पाहिजेत असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)