पाकिस्तानच्या संघाकडे कल्पकतेचा आभाव – सचिन तेंडूलकर

File photo

मॅंचेस्टर – भारतीय संघाने विश्‍वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव करत विजयाची परंपरा कायम राखली आहे. मात्र, पाकच्या पराभवानंतर त्यांच्या संघावर बरीच टिका होत असुन भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर यानेही पाकिस्तानच्या संघावर टिका केली असुन पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद ही संभ्रमीत व्यक्ती आहे आणि या संघात कल्पकतेचा अभाव आहे, असे मत त्याने व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना तेंडुलकर म्हणाला, “सर्फराज संपुर्ण सामना संभ्रमात होता, वाहब रियाज गोलंदाजी करताना त्याने शॉर्ट मिड-विकेटवर खेळाडू ठेवला होता, तर शाबाद खान आल्यावर स्लीप ठेवायचा.

त्याचाच काही कळत नव्हते काय करावे. त्याला कोणत्या गोलंदाजांना काय फिल्डींग लावायला पाहिजे हेच समजत नव्हते. त्याने कदाचीत व्यवस्थित रणनिती आखली नव्हती. त्याच बरोबर त्याच्यात कल्पकतेचा आभावही जानवला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)