पणजी – राज्याचे माजी महसूल मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता (७०) यांचे सोमवारी (दि. ८) रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. स्थानिक वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, त्यांचे पार्थिव मंगळवारी गोव्यात आणले जाणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक विवाहित मुलगा आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.