धनंजय महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल ; आमदार सतेज पाटील अनुपस्थित

कोल्हापूर: काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्यावतीने राष्ट्रवादी चे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अत्यंत साधेपणाने शक्तिप्रदर्शन न करता निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांचे कडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्यावतीने राष्ट्रवादी चे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अत्यंत साधेपणाने शक्तिप्रदर्शन न करता निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांचे कडे उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ ,आमदार संध्यादेवी कुपेकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, माजी आमदार पी.एन. पाटील , माजी आमदार के.पी. पाटील, धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक उपस्थित होते. धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे मात्र अनुपस्थित होते. सतेज पाटील अनुपस्थित राहिल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चर्चा होती. गेल्या पाच वर्षांमध्ये आपण कोल्हापूर मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचा विकास कामे केली असल्याचा दावा राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहेेेे. तसेच कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे आणि ती मानस ओळखते त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या वतीने हा अर्ज भरत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी देखील उपस्थित होते यावेळी राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रातील 40 जागांवर ती आघाडी विजय होईल, असा दावा केला

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here