जीवनगाणे : अधिक हाव बरी नाही…

-अरुण गोखले

माणसाचं काय आहे त्याचा स्वभाव काहीसा हावरेपणाचा आहे. माणसाला कितीही मिळाल ना तरी त्याला आणखी आणखी हवं असत. त्याच्या मनातली ही हाव पैशा अडक्‍याची असेल, मान सन्मानाची असेल, मोठेपणाची असेल किंवा अगदी सोन्या नाण्याचीही असेल. पण खरं सांगू का? हा लोभ, हे हावरेपण माणसाचा घात करत. त्याच्या जीवनातला आनंद ते हिरावून नेत.

कां मी म्हणतो ते पटत नाही कां? तुम्हाला ती त्या राजाची गोष्ट आठवत नाही का? थांबा जर आठवत नसेल तर मी आठवण करुन देतो.

एक होता राजा. आता राजा म्हटला कि त्याच्याकडे धन दौलत, दाग दागिने, पैसा अडका ह्याला काही कमतरता असणार आहे कां? राजाचा खजीना सोन्या नाण्यानी भरलेलाच असणार. असं असलं तरी त्या राजाला आपल्याला खूप सोन मिळावं असं वाटत होत.

एकदा त्या राजाने त्याच्यावर प्रसन्न झालेल्या देवाकडे असें वरदान मागितले की देवा तू मला असा वर दे की माझा हात लागताच ती वस्तू सोन्याची झाली पाहिजे.

तथास्तू असे म्हणून देव निघून गेला. राजाने सकाळी उठल्या उठल्या दूध पिण्यासाठी पेला हातात घेतला आणि काय आश्‍चर्य! राजाचा हात लागताच पेला सोन्याचा झाला. फळ कापून खावे म्हणून हातात सुरी घेतली तर ती सोन्याची झाली. आता न कापताच फळ खावं म्हणून त्याने फळाला हात लावला तर तेही सोन्याचं झालं.. राजाला हा चमत्कार पाहून मोठा आनंद झाला. तो उठ सुट दिसेल त्या वस्तूला हात लावू लागला आणि ती वस्तू सोन्याची होऊ लागली.

त्याच वेळी त्याची लडकी राजकन्या त्याला भेटायला आली, आता लेकीला आनंदाने जवळ घेऊन तिला ह्या चमत्कार दाखवायचा म्हणून त्याने तिला हात लावला आणि काय! दुसऱ्याच क्षणी ती राजकन्या सोन्याची एक पुतळी झाली. आणि आपण सुवर्णाच्या लोभानी आपल्क्‍या सोन्यासारल्ह्या लेकीला गमावून बसलो आहोत.

हे जेव्हा त्या राजाच्या लक्षात आले, तेव्हा तो रडू लागला, देवाला हाका मारू लागला, ते दिलेले वरदान परत घे, मला माझी लेक परत दे म्हणून विनवू लागला. तो म्हणू लागला, देवा! माझं चुकलं, मला क्षमा कर, माझ्या हावरेपणाची एवढी कठोर शिक्षा मला देऊ नकोस.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)