चाकणचे मराठा आंदोलन : पुढील सुनावणी 18 जुलैला
राजगुरूनगर – चाकण येथील मराठा मोर्चा आंदोलन हिंसाचार प्रकरणी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा तुर्तातूर्त अटकपूर्व जामीनावर आज राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी मोहिते यांच्या अटकपूर्व जामिनावर येत्या 18 जुलैला पुढील सुनावणी होणार होणार असल्याचा निर्णय दिला. मोहिते पाटील यांच्या येथील सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर त्यांना संरक्षण न देता, न्यायालयाने पोलिसांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मागविण्यात आले असून येत्या 18 जुलैला सुनावणी ठेवली आहे.
काय आहे प्रकरण..
चाकण येथे मराठा आरक्षण मिळावे यासाठी 30 जुलै 2018 या दिवशी सकल मराठा समाजाच्या वतीने जनआंदोलन व रस्ता रोको करण्यात आले होते. या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यावेळी चाकण पोलिसांनी जवळपास पाच हजार जणांवर यावेळी गुन्हे दाखल केले होते. 100 पेक्षा जास्त तरुणांना या आंदोलनप्रकरणी अटक करण्यात आली होती.
याचा तपास चाकण पोलिसांनंतर एसआयटीकडून केला जात आहे. या घटनेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नाव समोर आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.दोन दिवसांपूर्वी चाकण पोलीस माजी आमदार मोहिते यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजगुरूनगरसह चाकण येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यासह जिल्ह्यात या प्रकरणाची मोठी चर्चा होती.