आयटीनगरीच्या वाहतूक व्यवस्थेत बदल 

ड्रेनेज लाईनच्या कामासाठी 30 एप्रिलपर्यंत हिंजवडीत बदलली वाहतूक व्यवस्था

पिंपरी – “आयटी हब’ हे भूषण आणि वाहतूक कोंडीचे दूषण सोबतच असलेल्या हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. शिवाजी चौकापासून वर्तुळाकार वाहतूक केल्यानंतर वाहतूक कोंडीत बराच फरक पडला. सध्या वाकड रस्त्याच्या बाजूने भूमिगत सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार (दि.12) पासून पुन्हा बदल करण्यात आले असून सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी शिवाजी चौक ते इंडियन पेट्रोल पंप दरम्यान हे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार फेज-2 ते फेज-3 कडून येणारी सर्व जड वाहने ही टाटा टी जंक्‍शन येथून डावीकडे वळून चौकात इच्छित स्थळी जातील. यामध्ये केवळ ट्रक टेम्पे नाही तर कंपनीच्या बस, पीएमपीएमएल यांचा देखील समावेश असणार आहे. फेज एक कडून येणाऱ्या जड वाहनांना जॉमेट्रिक सर्कल येथून डावीकडे वळून टाटा टी जंक्‍शन येथून उजवीकडे वळून लक्ष्मी चौकातून इच्छित स्थळी जाता येणार आहे. वाकड कडून येणारी जड वाहने हे इंडियन ऑईल चौक येथून उजवीकडे वळून कस्तुरी चौकातून पुढे जातील.

सूर्या अंडरपास येथून येणारी जड वाहने ही वाकड नाका येथून डावीकडे न वळता सरळ भूमकर चौकातून आपल्या गंतव्याकडे जातील. तर कात्रज, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन व बाणेर येथून येणारी वाहने ही मुळा नदी पुलावरून सर्विहस रोडला न येता सरळ महामार्गावरून मायकार येथून डावीकडे वळून भूमकर चौकात जातील. फेज एक, दोन व तीनकडून शिवाजी चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या चार चाकी हलक्‍या वाहनांना व तीन चाकी रिक्षांना इंडियन ऑईल चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला असून चार चाकी हलकी वाहने व तीन चाकी रिक्षा यांनी शिवाजी चौकातून डावीकडे वळून कस्तुरी चौकातून इच्छित स्थळी जाता येणार आहे.

वाकड रस्त्याच्या बाजूने भूमिगत सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी 30 मार्च ते 30 एप्रिल असा कालावधी देण्यात आला आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हा बदल करण्यात आला आहे. मात्र या बदलामुळे आयटीयन्स थोडे नाराज झाले आहेत. कारण एनवेळेत हा बदल झाल्याने शुक्रवारी काही काळ नागरिकांचा गोंधळ उडला तर वाहतूक पोलिसांना भर उन्हात दमछाक करावी लागली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)