रॉबर्ट वढेरा जामीन रद्द करा – ईडीची मागणी

File photo.......

नवी दिल्ली: रॉबर्ट वढेरा यांना मनि लॉंड्रिंग प्रकरणात मिळालेला जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका सक्त वसुली विभागाने म्हणजेच ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे. वढेरा हे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेव्हणे आहेत. त्यांना दिल्लीच्या ट्रायल कोर्टाने 1 एप्रिल रोजी अटकपुर्व जामीन मंजुर केला होता. त्यांना देण्यात आलेल्या अटकपुर्व जामीनाचा तपास कामांवर विपरीत परिणाम होत आहे असे ईडीने आज कोर्टात सांगितले.

वढेरा यांच्या बरोबरच ईडीने त्यांचे निकटवर्ती मनोज अरोरा यांचा जामीन अर्जही रद्द करण्याची मागणी केली आहे. वढेरा यांनी लंडन मध्ये मालमत्ता घेतली असल्याची बाब ईडीने न्यायालयात मांडली असून ही मालमत्ता बेहिशोबी पैशातून घेण्यात आली आहे असे त्यांची म्हणणे आहे. बिकानेर येथील जमीनीच्या प्रकरणतही ईडी कडून त्यांची चौकशी झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here