#Foodiesकट्टा : स्वागत आखाडाचे …..

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर म्हणजे खवय्यांचे माहेरघर असेही म्हटले जाते. चोखंदळ पुणेकरांना हवी असलेली यम्मी चव आणि अस्सल महाराष्ट्रीयन, देश-विदेशातील क्‍युझिन्स अर्थात ओरिएंटल डिशेस असोत की अगदी नाश्‍त्याची मिसळ, इडली-सांबार असो की मांसाहारी अर्थात नॉन-व्हेजिटेरियन डिशेस असोत, पुण्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. फोडणीची पोळी-भाकरी, उकडीचे मोदक, पुरणपोळी असो की पिझ्झा-पास्ता असो,

अगदी बार्बेक्‍युच्या व्हरायटीजही पुणेकर आनंदाने स्वीकारतात. इथल्या अनेक खाऊ गल्ल्या म्हणजे तर पुणेरी खाद्यसंस्कृतीच्या वाटेकरीच म्हणायला हव्यात. समोसा खायचा तर कुठला, ढोकळा कुठला प्रसिद्ध आहे, मिसळीबाबत तर बोलूच नका, असा आविर्भाव अनेक पुणेकर आणतात. नक्की कुठे काय चांगले, दर्जेदार आणि स्वस्त मिळते, ते सांगण्याबाबत पुणेकर एकदम चुझी असतात आणि आपल्याला आवडणाऱ्या फूड जॉईंटची अमाप स्तुती करताना ते अजिबात थकत नाहीत. या व्हरायटीज अगदी सकाळी मिळणाऱ्या बन-मस्का-चहा ते पोहे-उप्पीटपासून अप्पे-कच्छी दाभेलीपर्यंत आणि चिकन तंदूरपासून शाही काश्‍मिरी गोश्‍तपर्यंत विविधता असलेल्या असतात.

मग अशा फूड जॉईंटस्‌मध्ये सध्या भर पडलेले बासुंदी चहाचे ठेले, अमृततुल्य आणि मग ऑथेंटीक साऊथ इंडियन, मराठवाडी मटण, खानदेशी तडका, अस्सल मालवणी, खरेखुरे कोकणी अशा प्रदेशनिष्ठ फूड व्हरायटीज यावरही चर्चा झडते. मग थाई फूड, चायनीज, मान्च्युरियन, इटालियन अशा देश-विदेशातल्या क्‍युझिन्सविषयी बोलताना तर पुणेकर थकत नाहीत. आजकाल असेही गमतीने म्हटले जाते, की अस्सल पुणेकर कोण; तर जो पुण्यात असताना पिझ्झा-पास्तावर ताव मरतो आणि परदेशात गेल्यावर इडली-सांबार, साबुदाण्याची खिचडी कुठे मिळेल, ते शोधत बसतो. गमतीचा भाग सोडला, तरी पुणेकर हे खवय्ये आणि पट्टीचे खाणारे आहेत, हे मात्र नक्की!

फर्ग्युसन कॉलेज रोड असेल किंवा जंगली महाराज रोड, टिळक रोड असेल अथवा केळकर रोड… अनेक रस्त्यांवर खाण्याच्या पदार्थांची चंगळ तुम्हाला अनुभवायला मिळेल. शिवाय या सर्व रस्त्यांना जोडणारे उपरस्ते गल्लीबोळ यामध्येही दक्षिण दावणगेरे, खानदेशी पदार्थ, अगदी अस्सल उत्तर भारतीय पराठे आणि बाहुबली थाळीपर्यंत व्हरायटीज दिसतील. आईस्क्रीम, कुल्फी आणि मस्तानीसाठीही अनेक ठिकाणी गर्दी उसळलेली दिसेल.

नॉनव्हेजमध्ये तर स्पर्धा इतकी टोकाला गेली आहे की, पुणेकरांचे नॉनव्हेज खाणे पाहून कोल्हापूरकरांनी चकीत व्हावे. गोअनीज करी, मालवणी स्पेशलसह कोंबडी वडे, कडकनाथ कोंबडी, बोल्हाईचे मटण असा मोठा वर्गही आढळतो. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, बोंबिलाची चटणी अशा प्रकारांपासून कोकणी जेवणाची लज्जत वाढवणारी सोलकढीही खवय्या पुणेकरांची पसंती असतेच. त्यामुळे आखाडाची मजा अनुभवायची असेल तर पुण्यातले गल्लीबोळ पालथे घातले पाहिजेत. कुठे काय, नवीन काय आणि रेट-क्वॉलिटी काय यावर नुसत्याच चर्चा घडवण्यापेक्षा त्या त्या ठिकाणी जाऊन धाड मारणे, हेच अस्सल पुणेकराचे खवय्येपणाचे लक्षण मानले गेले आहे. अशातच आखाड आला तर मग सामीष भोजनासाठी (अर्थात नॉनव्हेज) कोणते नवे पर्याय आहेत, याविषयीही चर्चा झडू लागतातच. तर वाचूया त्याविषयी…

खास पुणेकरांसाठी हॉटेल लज्जत आता नॉनव्हेजमध्ये 

सदाशिव पेठेतील अल्पावधीतच लोकप्रिय झालेले हॉटेल लज्जत व्हेज नॉनव्हेज म्हणजे आपली स्वतःची एक वेगळी चव आहे. इथली खासियत म्हणजे अप्रतिम बिर्याणी व तंदुरी चिकन तर आहेच, पण चिकन आणि मटणसुद्धा तेवढ्याच अप्रतिम चवीचे असण्यामागचे कारण म्हणजे बेलचिकचे ब्रॅंडेड चिकन व सोनाली मटण शॉपचे रोजचे ताजे मटण व मसाले.

त्याचप्रमाणे जागेवर बनविलेल्या मऊसूत चपात्या, चुलीवरच्या भाकरी आणि खवय्यांच्या आवडीनुसार मिळणारा गरमागरम इंद्रायणी भात आणि पांढरा रस्सा वाजवी दरात असल्यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले असून पुण्यातील खवय्यांच्या आवडीचे ठिकाण होत आहे. मग आपण कधी येताय नॉनव्हेजची लज्जत चाखायला…

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)