Hotel Jai Bhawani Mutton Bhakari – तुमच्या समोर वाढलेल्या ताटात चिकन, मटण, अंडी हे पदार्थ नसल्यास जर तुम्हाला सुनंसुनं वाटत असेल, आठवड्यातून दोन – तीनदा तरी नॉन व्हेजवर ताव मारल्याशिवाय जीव खालीवर होत असेल, अर्थात जर तुम्ही ‘नॉन व्हेज’ जेवणाचे अस्सल दिवाने असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आज आम्ही तुम्हाला अशी खाद्य सफर घडवून आणणार आहोत, जी पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल अन् तुम्ही थेट इथल्या मटणावर ताव मारण्यासाठी अन् झणझणीत रस्सा चाखण्यासाठी बेतच आखाल!
तर मित्रांनो हे ठिकाण आहे हॉटेल जयभवानी मटण-भाकरी. जयभवानी मटण-भाकरी हे नॉन व्हेज प्रेमींसाठीचं जगात भारी असं हॉटेल पुण्या जवळील खेड शिवापूरमध्ये आहे. पुण्यापासून फार तर फार अर्ध्या पाऊण तासाचे अंतर. जाताना निसर्ग इतका भारी की आठवड्याभराचा कामाचा स्ट्रेस जाताजाताच गायब!
रस्त्यालगतच असलेल्या जयभवानी मटण-भाकरी हॉटेलमध्ये प्रवेश करताच मटणाचा अन् झणझणीत रस्स्याच्या सुगंधानेच नॉन व्हेज प्रेमींच्या पोटात अक्षरशः कावळे ओरडायला लागतात. आम्ही इथं भेट दिली तेव्हा आमच्यासोबतही असंच झालेलं बरका… एवढी भूक लागली की, स्टार्टर, बिर्टरवर काट मारून डायरेक्ट मेन कोर्सला हात घातला. अन् ‘जयभवानी’ म्हणून थेट स्पेशल मटण थाळी ऑर्डर केली!
ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या ५ मिनिटात टेबलावर अक्षरशः स्वर्गच अवतरला ना! अर्थात नॉन व्हेज प्रेमींसाठीचा स्वर्ग… ताटात काळ्या मसाल्यातलं मटण, गरमागरम झणझणीत रस्सा, प्युअर आळणी सूप, तव्यावरून डायरेक्ट ताटात वाढलेली भाकरी, मटण खिमा… आ… हा.. हा.. अस्सल गावरान! मग काय येथेच्छ ताव मारला ना राव!
आणि हो नुसता तावच मारला नाही तर तुमच्यासाठी व्हिडीओपण बनवून आणलाय… पण व्हिडीओ पाहण्याच्या आधीच डिस्कक्लेमर – व्हिडीओ पाहून तोंडाला पाणी सुटू शकते… तातडीने हॉटेल जयभवानी मटण-भाकरीमध्ये जाऊन अस्सल गावरान जेवणावर ताव मारावा वाटू शकतो…. ENJOY!
अस्सल गावरान बेत! काळ्या मसाल्यातलं मटण, झणझणीत रस्सा अन् भाकरी! | Hotel Jai Bhawani Mutton Bhakari
तुम्हालाही पुण्याच्या आसपास तुमच्या मित्र, मैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत काळ्या मसाल्यातलं मटण, झणझणीत रस्सा अन् भाकरी असा अस्सल गावरान बेत आखायचाय? विचार कसला करताय आजचं हॉटेल जय भवानी मटण भाकरीला भेट द्या!
लोकेशन – https://goo.gl/maps/5TL3CWqH169uWiEL6
कॉन्टॅक्ट – 9657300024