आषाढ सुरू झाला की नॉनव्हेज खवय्यांना आखाडाचे वेध लागतात आणि मग पावलं वळतात ती बिबवेवाडीतल्या हॉटेल निमंत्रणकडे ! कारण नॉनव्हेजमधल्या आगळ्यावेगळ्या डिशेससाठी हॉटेल निमंत्रण संपूर्ण पुण्यात सुप्रसिद्ध आहे. निमंत्रणचा माहौल इतका सुंदर आहे की, खाण्यासोबतच गप्पाही मस्त रंगतात.
तर यंदाही हे हॉटेल निमंत्रण आखाडासाठी सज्ज झालं आहे. जंगली चिकन, स्पेशल चिकन हांडी, चिकन पॉट राईस, गावरान चिकन हांडी, चिकन तंगडी कबाब आणि निमंत्रण स्पेशल चिकन बिर्याणी या निमंत्रण स्पेशल डिशेस तर खवय्यांना भुरळ घालतातच. आता आखाडासाठी काही नवीन डिशेसही तुमच्या जिभेला तृप्त करतील. यामध्ये घरगुती चिकन, चिकन कुंदापुरी, चिकन घी रोस्ट, चिकन शिकारी कबाब या डिशेस अवश्य खायला हव्यात.
तुमच्यासोबत व्हेजवाले जरी असतील तरी चिंता नाही. हॉटेल निमंत्रणमध्ये इंडियन, चायनीज, कॉंटिनेंटल अशी विविध खाद्यसंस्कृती आहे. चवींच्या या राज्यात स्वतःचे साम्राज्य तयार केलं असं म्हणता येईल इतपत इथल्या डिसेश स्वादिष्ट आहेत. स्वतः श्री. प्रशांत शेट्टी यांनी केटरिंगचा डिप्लोमा केलेला आहे. त्यामुळे त्यांचे हे “निमंत्रण’ स्वीकारून तिथे मेजवानी घेण्यासाठी ग्राहक आवर्जून येतात. तेव्हां आखाडातला कुठलाही बेत ठरवत असाल तर हे निमंत्रण लक्षात ठेवायलाच हवं.