अनन्या पांडेची “सो पॉझिटिव्ह’ मोहिम

बॉलिवूडमधील कलाकारांना त्यांच्या एखाद्या वक्तव्यामुळे, पेहरावामुळे किंवा अगदी भूमिकेमुळेही सर्रास ट्रोल केले जाते. त्यामुळे बऱ्याचदा कलाकारांना आपले मत मोकळे पणाने मांडता येत नाही. असाच अनुभव काही दिवसांपुर्वी अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची प्रेयसी मलायका अरोराला आला होता. परंतु, याच ट्रोलिंगविरोधात जनजागृती करण्यासाठी अभिनेत्री अनन्या पांडेने पुढाकार घेत “सो पॉझिटिव्ह’ अशी मोहीम सुरू केली आहे.

यासंदर्भात तिने आपल्या सोशल साईटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात ती म्हणाली आहे की, “माझ्या दिसण्यावरून, चंकी पांडे यांची मुलगी असण्यावरून, अभिनय कौशल्यावरून, फॅशनवरून मला खूप ट्रोल केले गेले. एव्हडेच नाही तर माझ्या शिक्षणावरूनही अनेक प्रश्‍न उपस्थित केले गेले.

जे मला ओळखतसुद्धा नाहीत, त्यांना माझ्यावर टीका करण्याचा काहीच हक्क नाही,’ त्यामुळे आता मी अशा ट्रोलर्सकडून नकारात्मकता स्विकारणार नाही आणि सोशल मीडियावर सकारात्मकता वाढवण्यासाठी मी ही मोहीम सुरू करत आहे. अनन्याच्या पावलाचे अनेकांनी कौतूक केले असून तिच्या या मोहिमेला कितपत यश येते हे पहाणे मह्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)