काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाची सनी देओलवर कारवाई 

चंदिगढ – बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावत असून तो यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. दरम्यान, आपल्या पहिल्यावहिल्या निवडणुकीमध्येच सनीला निवडणूक आयोगाच्या कारवाईला सामोरे जावे लागले असून निवडणूक आयोगाने काँग्रेसने सनी देओल विरोधात केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यंदा निवडणूक आयोगाने प्रथमच उमेद्वारांतर्फे समाजमाध्यमांवरील जाहिरातबाजीसाठी करण्यात येणाऱ्या खर्चाचा देखील समावेश उमेदवाराला घालून देण्यात आलेल्या खर्चाच्या मर्यादेमध्ये केला असल्याने उमेदवारांना समाजमाध्यमांवरील खर्चाचा लेखाजोखा निवडणूक आयोगापुढे मांडणे अनिवार्य झाले आहे. मात्र असं असताना देखील अभिनेता सनी देओल याचा प्रचार करणाऱ्या ‘फॅन्स ऑफ सनी देओल’ फेसबुक पेजबाबतची माहिती सनी देओलने निवडणूक आयोगाला दिली नव्हती. काँग्रेसने ही गोष्ट निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर निवडणूक आयोगाने सनीला एक नोटीस देखील बजावले होते. मात्र त्याचे देखील उत्तर देण्यात न आल्याने शेवट निवडणूक आयोगाने सनी देओलवर कारवाई करत त्याच्या निवडणूक खर्चात फेसबुक पेजचा वापर करून जाहिरातबाजी केल्याबाबत १ लाख ३७ हजारांची भर घातली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, गुरुदासपूर येथून भाजपच्या सनी देओल याच्या विरोधात विद्यमान खासदार व काँग्रेस नेते सुनील जाखर हे निवडणुकीच्या मैदानात असून हा सामना अटीतटीचा होणार असल्याचं मानलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)