कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नगर: भरधाव वेगात जाणाऱ्या टेंम्पोने पुढे चाललेल्या अवजड वाहनास पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत बाबा गुलाब शेख (वय 44, रा.मढी, ता.पाथर्डी) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.13) पहाटे 4.30 वाजता केडगाव बायपास चौकात घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, टेम्पोचालक बाबा गुलाब शेख हे त्यांचा टेम्पो (क्र.एमएच 48 ए.वाय 9092) जात असताना नगर-पुणे महामार्गावर केडगाव बायपास चौकातून जाणाऱ्या अवजड वाहनास टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत बाबा शेख यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी कोतवाली पोलीसांनी हबीब बशीर शेख यांच्या फिर्यादीवरून मोटारवाहन कायद्या प्रमाणे अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पो.ना.डोळे हे करीत आहेत.