अमेठीच्या विजयानंतर स्मृती इराणी सिद्धीविनायकाचरणी

मुंबई – लोकसभा निवडणुकीत अमेठीतून स्मृती इराणी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना धुळ चारली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांनी 14 किलोमीटर चालत जाऊन मुंबईतील सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर दिग्दर्शक एकता कपूर यादेखील दर्शनासाठी आल्या होत्या. याबाबत एकता कपूर यांनी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत माहिती दिली.

मंदिरात दर्शनापूर्वी स्मृती इराणी आणि एकता कपूर यांनी एक सेल्फी घेऊन तो इन्स्टाग्रामवर आणि ट्विटरवर शेअर केला. तसेच 14 किलोमीटर सिद्धीविनायक मंदिरापर्यंत चालत गेल्यानंतर चेहऱ्यावरील ग्लो असे त्याला कॅप्शन दिले. तसेच यावर स्मृती इराणी यांनीही कमेंट करत देव दयाळू आहे, देवाची इच्छा होती, असे कमेंटही केले आहे. तसेच यानंतर एकता कपूर यांनी यासंदर्भात एक व्हिडिओही शेअर केला आहे.

दरम्यान, स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा अमेठीमध्ये 55120 मतांनी पराभव केला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर त्या जायंट किलर ठरल्या. तब्बल 39 वर्षांनंतर गांधी परिवारातील सदस्याला या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)