पिंपरी – भरधाव वेगात जाणाऱ्या मोपेड दुचाकीने रस्ता ओलंडणाऱ्या महिलेला जोराची धडक दिली. यात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना 28 जून रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वाकड येथील काळाखडक झोपडपट्टी समोरील रस्त्यावर घडली.
सविता सिध्दराम गायकवाड (वय-35) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा दीर लखाप्पा तुकाराम गायकवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन शुभम विजय बाकडे (वय-23, रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.