५ नव्हे १० वर्षांसाठी मोदींना कौल द्या – भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या माजी खासदाराचे आवाहन

दिल्ली – काँग्रेसचे केरळातील कोल्लम लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार एस कृष्णा कुमार यांनी आज दिल्ली येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आपल्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना एस कृष्णा कुमार यांनी सांगितले की, “माझ्या उर्वरित आयुष्याचा हेतू हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे एवढाच असून मी भारतीय जनतेला आवाहन करतो की त्यांनी देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांना केवळ ५ वर्षांसाठी नव्हे तर येणाऱ्या १० वर्षांसाठी पंतप्रधानपदी बसवावे. मला खात्री आहे की येत्या दहा वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगती करून जगभरामध्ये शीर्ष स्थान कमावेल.”

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून राहून गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केल्याने या मतदारसंघाला चांगलेच राजकीय वजन प्राप्त झाले आहे. राहुल गांधींच्या केरळातून निवडणूक लढविण्याच्या निर्णयानंतर केरळमध्ये राजकीय घडामोडींना देखील चांगलाच वेग प्राप्त झाला आहे. अशातच आज काँग्रेसचा एक माजी खासदार भाजपच्या गळाला लागल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)