पाटणसाठी 48.53 कोटींचा निधी

कराड – मुंबई येथे झालेले अधिवेशन सकारात्मक झाले असून हा अर्थसंकल्प ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना भरघोस निधी उपलब्ध करुन देणारा लोकाभिमुख व वचनपूर्तीचा अर्थसंकल्प ठरला आहे. अधिवेशनात पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी सुमारे 48 कोटी 53 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केला असल्याची माहिती पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बबनराव भिसे उपस्थित होते. आ. देसाई म्हणाले, “”पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते, पुलांचे कामासाठी 15 कोटी 31 लाख तर डोंगरी विकासमधून करण्यात येणाऱ्या विद्युत कामासाठी 11 कोटी 22 लाखाचा निधीस मंजूर मिळाली आहे. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकासाठीचा दुसऱ्या टप्प्यातील 15 कोटी निधीसही मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मागण्यांमध्ये ग्रामीण भागामध्ये रस्त्याचे जाळे निर्माण करण्यासाठी प्राधान्य देवून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना नॉनप्लॅनमधून 24 कोटी 10 लाखाचा निधी मंजूर करावा. तसेच मतदारसंघातील पुलांच्या 21 कोटी 80 लाख रुपयांची कामे प्रस्तावित असून त्यांनाही लवकरच मंजूरी मिळेल, असेही आ. देसाई यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)