पुणे – गणेश विसर्जन मिरवणूकीच्या दिवशी वनाज ते गरवारे या मेट्रो मार्गावर रात्री एक वाजेपर्यंत मेट्रोची सेवा असणार असल्याचे महामेट्रोकडून जाहीर करण्यात आले आहे, त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला दिवसभर आणि रात्रीही पुणेकरांना मेट्रोच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
ही सेवा केवळ पुणे शहरातील वनाज ते गरवारे मार्गासाठी असणार असल्याचे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले. तर दर अर्ध्या तासाला मेट्रो असणार आहे.
महामेट्रोकडून 6 मार्चपासून वनाज ते रामवाडी मार्ग सुरू करण्यात आला आहे. दररोज सकाळी सात ते रात्री दहा या कालावधीत सुरू असते. मात्र, शहराची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी पर्यंत सुरू असल्याने तसेच रात्री 12 नंतर विसर्जन मिरवणूकीत वाद्य वाजविण्यास बंद करण्यात येत असल्याने त्यानंतर नागरिक घरी परतात.
त्यामुळे, मेट्रोकडून शुक्रवारी सकाळपासून शनिवार पहाटे 1 वाजे पर्यंत मेट्रोची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.