किरकोळ वादातून पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला

केडगाव – चौफुला-बोरीपार्धी (ता. दौंड) या ठिकाणी किरकोळ वादातून पतीने पत्नीवर कुराडीने जीवघेणा हल्ला करून कात्रीने तिचे नाक कापण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

तानाजी वाघमारे असे या आरोपी पतीचे नाव असून यवत पोलीस स्थानकात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की आरोपी तानाजी वाघमारे याने आपली पत्नी रेखा वाघमारे हिच्यावर किरकोळ वादातून चिडून जाऊन, सांगितलेलं ऐकू वाटत नाही का, असे म्हणत अगोदर उजव्या पायावर कुऱ्हाडीने घाव घातला.

या घावाने रेखा खाली कोसळताच तिच्या पोटावर पाय ठेऊन तिच्या मानेवर कुऱ्हाडीने दुसरा घाव घातला. त्यानंतर त्याने घरातून कात्री आणून तिचे नाक कापण्याचा प्रयत्न करीत असता रेखाने त्याला दूर ढकलून दिले, त्यामुळे त्याने चिडून जात पुन्हा रेखाच्या दोन्ही हातांवर कुऱ्हाडीने घाव घालून तिथून निघू गेला पतीने केलेल्या निर्दयी हल्ल्यानंतर रेखा हिला तातडीने वरुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असून पुढील तपास पोलीस हवालदार बंडगर
करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here