कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याचा जलवा

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींच्या लूकची जोरदार चर्चा असतांना आता ऐश्वर्या रायच्या लूकने कान्समध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये सामील ऐश्वर्या राय बच्चन 70व्या कान फिल्म समारंभात जेव्हा रेड कार्पेटवर आली तेव्हा प्रत्येकाची नजर तिच्यावर होती. पॅरिस- फ्रान्समध्ये सुरु असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींच्या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. आता दीपिका पदुकोणनंतर ऐश्वर्या रायच्या लूकने कान्समध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजकन्येसारखा निळया रंगाच्या ड्रेसमध्ये ऐश्वर्याचे सौदर्य अधिकच खुलून दिसत होते. इतक्‍या वर्षांमध्ये रेड कार्पेटवर ऐश्वर्याच्या ड्रेसिंग स्टाइलचा प्रवास फारच वरखाली राहिला आहे. सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या रायच्या ड्रेस आणि सुंदरतेची चर्चा होत आहे. कोणी म्हटले सिंड्रेला तर कोणी म्हटले बार्बी गर्ल. कान्समधील ऐश्वर्याचे हे 16 वे वर्ष असून लॉरियल या ब्रॅंडची सदिच्छा दूत असल्याने तिला नेहमी आमंत्रित केले जाते. कान्सच्या पहिल्या दिवशी दीपिकाचा जलवा पाहण्यासारखा होता. दीपिका वाइन कलरच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर उतरली अन्‌ सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर तेवढीच हॉट अन्‌ सेक्‍सी दिसत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)