बॉलिवूडमध्ये मर्डर, रेप, ड्रग्स केस पासून ते लफडेबाजपर्यंत विषय निघाला तर त्यामध्ये पेंग्विन असणारच : निलेश राणे

मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली आहे. राज पॉर्न फिल्म निर्मिती रॅकेटचा प्रमुख सुत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व राज कुंद्रा यांच्या संवादाचा एक फोटो शेअर करत जोरदार टीका केली आहे.

बॉलिवूडमध्ये मर्डर केस, रेप केस, ड्रग्स केस पासून ते बॉलीवूड मध्ये कुठल्याही लफडेबाज माणसापर्यंत विषय निघाला तर पेंग्विन त्यामध्ये असणारच. असा आरोप निलेश राणे यांनी यावेळी केला आहे. पेंग्विन बॉलिवूडचा भाड्यावर घेतलेला आणि त्यांची भांडी घासणारा राजकारणी आहे. असा जोरदार हल्ला निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे.

निलेश राणे म्हणाले की, ”बॉलिवूडमध्ये मर्डर केस, रेप केस, ड्रग्स केस पासून ते बॉलीवूड मध्ये कुठल्याही लफडेबाज माणसापर्यंत विषय निघाला तर पेंग्विन त्यामध्ये असणारच. पेंग्विन बॉलिवूडचा भाड्यावर घेतलेला आणि त्यांची भांडी घासणारा राजकारणी आहे. लाज सोडली आहे ह्या सगळ्यांनी.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.