बुलडाणा – बुलडाणा जिल्ह्यातील चिखली परिसरात तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हे तरुण फोटोशूटकरुन दुचाकीवरुन परत येत असताना वेगात असणाऱ्या दुचाकीने जे.सी.बी. मशीनला जोरदार धडक दिली. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शेख दानिश बिबन उर्फ मोनू, वय18, फिरोज सलीम खान, वय 17 व रोहित प्रदीप कंकाळ,वय 19 हे तिघेजण पल्सर बाईकने फोटोशूटसाठी गेले होते. चिखली एमआयडीसीत फोटोशूट झाल्यावर ते घराकडे परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. ही घटना चिखली-देऊळगावराजा महामार्गावरीवरील रेणुका पेट्रोलपंपासमोर घडली आहे. हा अपघात जवळलील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
शेख दानिश बिबन याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर फिरोज खान सलीम खान याचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.