शालेय विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिले “आभाराचे”तिळगुळ
पुणे,दि.15- पुणे महानगर पालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय उर्दू माध्यम लक्ष्मीनगर,पर्वती येथील विद्यार्थ्यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे स्वतः तयार केलेले शुभेच्छा पत्र देऊन तिळगुळ समारंभ आयोजित केला होता. यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष आभार मानले.
या वेळेस मुख्यध्यापिका डॉक्टर नसरीन रमजान सय्यद,शिक्षक रेश्मा युनूस इनामदार,मोहमद इब्राहिम सोफिसाब मुंडेवाडी, फिरदोसजहां कासीम पठाण,रुबिना फारुख खान,आसमा अब्दुल नदाफ,रेशमा अब्दुल नदाफ हे उपस्थित होते.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी मुलांना तिळगुळ देऊन त्यांचे स्वागत केले व मुलांनी पोलीस विभागा बद्दल कृतज्ञ भावना व्यक्त केले त्या बद्दल आभार मानले. या प्रसंगी कम्युनिटी पोलिसिंग चे पोलीस कॉन्स्टेबल विशाल साळुंखे,निलेश बोडके उपस्थित होते.
सदैव आपल्या कर्तव्यावर व्यस्त असणाऱ्या आमच्या पोलिस काकांचे आभार मानायचे म्हणून आम्ही आज आवर्जून दत्तवाडी पोलीस स्टेशन ला येऊन सर्व पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचारी यांना तिळगुळ देण्याचे ठरवले होते कारण ते आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत ही आमची लहान मुलांची भावना त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचा आमचा हा प्रयत्न आहे ही भावना एका शालेय विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे