नारायणगाव-कुरण येथील जयहिंद शैक्षणिक संकुलामध्ये नवीन औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला (आयटीआय) राज्य व केंद्र शासनाची चालू शैक्षणिक वर्षापासून (2019-20) मान्यता मिळाली आहे. या आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, सर्वेअर हे दोन वर्षाचे तर वेल्डर हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम चालविला जाणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. गल्हे यांनी दिली.
डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग (डीजीटी) नवी दिल्ली व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संयुक्त संलग्नता निरिक्षण करण्यात आले. या निरिक्षणामध्ये शासनाच्या नियम व मानकांनुसार सर्व सुविधांची तपासणी करण्यात येऊन वरील अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली.
जयहिंद शैक्षणिक संकुलामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन व जयहिंद इंटरनॅशनल स्कुल आधीपासूनच सुरू असून आणखी नवीन शाखा सुरू करण्याची तयारी संस्थेने केलेली आहे. जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय हे नॅक मानांकित असून तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयाला यापूर्वीच आय. एस. ओ. मानांकन प्राप्त झालेले आहे. तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश सुरू असून इच्छुक पालक व विद्यार्थ्यांनी 9766000214 या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.