नवी दिल्ली – केंद्र सरकारला करोनावरील झायकोव्ह-डी या लसीचा पुरवठा सुरू केल्याचे झायडस कॅडिला या औषध उत्पादक कंपनीने बुधवारी जाहीर केले. सरकारने केलेल्या मागणीनुसार आम्ही या लसीचा पुरवठा सुरू केला आहे. खासगी बाजारपेठेतही आम्ही लसीचा पुरववठा सुरू करणार असल्याचे कंपनीने या निवेदनात म्हटले आहे.
या लसीची किंमत 265 रुपये निश्चित करण्यात आली असून वापरणाऱ्याला प्रती डोस 93 रुपये खर्च होतील, असे या कंपनीने स्पष्ट केले आहे. या लसीच्या उत्पादनासाठी अहमदाबादमधील या कंपनीने शिल्पा मेडीकेअर लि. या कंपनीसोबत या लस उत्पादनाचा करार केला आहे.