Heath Streak Dead Or Alive? Former Zimbabwe Cricketer Reveals The Truth : झिम्बाब्वेचा दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार हिथ स्ट्रीक याचं वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाल्याच्या वृत्तानं क्रिकेटविश्वात खळबळ उडाली होती. मात्र हिथ स्ट्रिकचा झिम्बाब्वेच्या संघातील सहकारी हेन्री ओलोंगा याने हिथ स्ट्रिकच्या निधनाचं वृत्त खोटं असल्याची माहिती दिली आहे. तसेच स्वत: हिथ स्ट्रिकनेच आपण जिवंत असल्याचे आपल्याचा मेसेज करून सांगितल्याचा दावा हेन्री ओलोंगाने केला आहे.
दरम्यान..घडलं असं की, झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू हिथ स्ट्रिक याचं कर्करोगानं निधन झाल्याचं वृत्त आज सकाळी पसरलं होतं. त्यानंतर स्ट्रीकचा संघातील सहकारी हेनरी ओलंगा यानेही ट्विट करून आपल्या परम मित्राला श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे स्ट्रीक गेल्याची सर्वांनाच खात्री पटली.
त्यानंतर, जगभरातील क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत क्रिकेटपटूला श्रद्धांजली वाहिली. त्यात भारतीय खेळाडूंचाही समावेश होता. आर अश्विन आणि वीरेंद्र सेहवाग यांनी ट्वीट करत स्ट्रीकला श्रद्धांजली वाहिली होती.
मात्र, स्ट्रीकचं निधन ही केवळ अफवा असल्याचं दिसून आलं तेव्हा ओलंगाने ट्विट डिलिक्ट केेेेलं अन् नव्यानं ट्विट करत दिलगिरीही व्यक्त केली आहे. तसेच आपल्या मित्राला दीर्घायुष्य लाभण्याची कामनाही केली आहे. त्यानंतर आर अश्विन आणि वीरेंद्र सेहवाग यांनीसुध्दा आपलं जुन् ट्वीट डिलीट केले आहे.
माजी क्रिकेटपटू हेन्री ओलांगानेही पहिले ट्विट डिलिक्ट करत नवीन ट्विट केलं आहे. त्याचबरोबर ओलांगाने स्ट्रीकसोबतच्या त्यांच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट पोस्ट करताना वर कॅप्शन देतानाा लिहलं आहे की, “मी हे सुनिश्चित करु इच्छितो की हिथ स्ट्रीकच्या निधनाची अफवा पसरली आहे. आताच मला त्याचा मेसेज आला. तिसऱ्या पंचांनी त्याला पुन्हा बोलवून घेतलं आहे.तो खूप मनमोकळा माणूस आहे आणि तो जिवंत आहे.”
दोघांमधील Whatsapp संभाषणांचा मजकूर…
“अरे मी जिवंत आहे. तातडीने हा धावबाद देण्याचा निर्णय मागे घे,” असा मेसेज हीथ स्ट्रीकने केला आहे. यावर हेन्री ओलोंगाने त्याला रिप्लाय केला की, “हाहा.. हे ऐकून बरं वाटलं. अशा गोष्टी वेगाने पसरतात,” असा रिप्लाय हेन्री ओलोंगाने केला.
काय होत पहिलं ट्विट…
हेन्री ओलांगा याने पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “हिथ स्ट्रीक आता दुस-या जगात गेल्याची दुःखद बातमी आली आहे. झिम्बाब्वे क्रिकेटच्या या महान क्रिकेटपटूच्या आत्म्याला शांती लाभो. तुझ्यासोबत खेळणे हा एक सन्मान आहे.”
स्ट्रीकलाही बसला धक्का….
संपूर्ण क्रिकेट जगत शोकसागरात बुडालेलं असतानाच आपल्या मृत्यूची बातमी ऐकून स्वत: स्ट्रीकलाही धक्का बसला. त्याने त्याच्या मृत्यूच्या अफवा फेटाळून लावताना म्हटले आहे की, “ही संपूर्ण अफवा आणि खोटेपणा आहे. मी जिवंत आहे आणि निरोगी आहे. मला हे जाणून खूप त्रास झाला आहे की, एखाद्या व्यक्तीच्या जाण्याएवढी मोठी गोष्ट पुष्टीशिवाय, खात्री केल्याशिवाय कशी काय पसरवली जाऊ शकते, विशेषतः सोशल मीडियाच्या आमच्या युगात.”
स्ट्रीकची आंतरराष्ट्रीय कारकिर्द…
झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार हिथ स्ट्रीकने वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी बोर्डाशी झालेल्या वादामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. स्ट्रीक झिम्बाब्वेसाठी 65 कसोटी आणि 189 वनडे खेळला आहे. यादरम्यान त्याने दोन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 4933 धावा देत 455 बळी घेतले आहेत.
2005 मध्ये, स्ट्रीकने कोचिंगच्या जगात पाऊल ठेवले ज्यामध्ये त्याने आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स व्यतिरिक्त बांगलादेश, झिम्बाब्वेसाठी प्रशिक्षकाची भूमिका बजावली. 2021 मध्ये, लाचलुचपत प्रतिबंधक संहितेच्या पाच उल्लंघनांमुळे ICC ने स्ट्रीकवर 8 वर्षांसाठी बंदी घातली होती. तर 2023 मध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी केले होते की, हिथ स्ट्रीक हा कर्करोगाशी लढा देत आहे आणि दक्षिण आफ्रिकेत त्याच्यावर उपचार सुरू आहेत.