खडकी (प्रतिनिधी ) – खडकी येथील युवा फाउंडेशनच्यावतीने रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना एकावेळचे जेवण वाटण्यात आले. कोरोना विषाणूच्या विळख्यातून वाचण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व दुकाने, हॉटेल बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांची उपासमार होत आहे.
अशा लोकांना युवा फाउंडेशनचे धर्मेश शाह वरमेश पारेख अश्विन ऍंथोनी व त्यांच्या सहकाऱ्यानी 135जणांना पुलाव एक पाण्याची बाटली देण्यात आली.तसेच खडकी कॅन्टोमेंटच्या सफाई कामगारांना नाष्टा व चहा देण्यात आला.
या लॉकडाउनच्या काळात पोलीसदल सुध्दा रस्त्यावर उभे आहेत त्या पोलिसांनासाठी पाण्याची बाटली व चहा वाटप करण्यात आले.