मोबाइल गेम खेळल्यानंतर युवकाची आत्महत्या

उरुळी कांचन – मोबाइल गेममुळे एका युवकाचे मानसिक संतलुन बिघडल्याचे वृत्त ताजे असतानाच मोबाइल गेम खेळून झाल्यानंतर त्याच रात्री उरुळीकांचन येथे युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सौरभ नितीन काटकर (वय 19, मूळ गाव सोरतापवाडी) याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. याबाबत सौरभ याच्या मित्रांकडे पोलिसांनी चौकशी केली असता काही मित्रांनी सांगितले की, सौरभ हा रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत मोबाइल गेम खेळत होता. त्यामुळे त्याने याच कारणातून गळफास घेतला आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत.

नितीन काटकर हे आपल्या पत्नी व मुलांसह उरुळी कांचन येथील पोलीस स्टेशनमागील ज्योती सोसायटीमध्ये राहतात. सोमवारी (दि. 23) संध्याकाळी जेवण केल्यावर गप्पा मारून झाल्यावर सर्व आपआपल्या खोलीत जाऊन झोपले. नितीन काटकर हे कोल्हापूरला जाण्यासाठी सौरभ यास आज पहाटे 5च्या सुमारास उठविण्यासाठी गेले असता तो उठला नाही. त्यामुळे दरवाजा तोडला असता सौरभ याने गळफास घेतल्याचे आढळून आले. फुलांचे व्यापारी नितीन काटकर यांचा सौरभ हा एकलुता एक मुलगा होता. थेऊर विद्यालयातील शिक्षक शांताराम काटकर यांचातो पुतण्या होता.

Leave A Reply

Your email address will not be published.