तरुणांनो, सोशल मीडियापासून दूर रहा : संभाजी भिडे

पुणे – पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने शिवप्रतिष्ठानचे धारकरी पुण्यात आले होते. पालख्यांच्या आगमनापूर्वी जंगली महाराज येथे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी “तरुणांनी सोशल मीडियापासून दूर रहावे, तसेच रायगडावर साकारण्यात येणाऱ्या 32 मण सोन्याच्या सिंहासनासाठी प्रत्येक गावात जाऊन लोकांकडून पैसे जमा करा,’ असे आवाहन भिडे गुरूजी यांनी केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवप्रतिष्ठानचे भगवा फेटा धारण केलेले शेकडो धारकरी वारीत सहभागी झाले. केवळ सोशल मीडियावर काहीतरी मते प्रकट केले म्हणजे तुम्ही प्रतिष्ठानचे कार्यकर्ते होतात असे नाही, तर प्रत्यक्ष लढाईत उपयोगी पडेल असे गुण कार्यकर्त्यांनी अवलंबिले पाहिजे,’ असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.