रशिय-युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. युक्रेनवर रशियन केलेल्या हल्ल्याचा आज 14 वा दिवस आहे. 14 दिवसांनंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले कमी झालेले नाहीत. राजधानी कीवसह अनेक शहरांमध्ये आता सर्वत्र विध्वंस दिसत आहे.
या युद्धादरम्यानचे फोटो व्हिडिओ सोशलवर चांगलेच व्हायरल झाले आहे. अशाच एका फोटोची चर्चा सध्या सोशलवर सुरु आहे. या फोटो एका युक्रेनियम महिला आपल्या मुलाचा हात हातात घेऊन युद्धभूमीत रस्त्यावरुन चालत आहे. तर तिच्या खांद्यावर रायफल दिसती आहे.
या फोटोला युक्रेनच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीने हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये एक महिला आपल्या मुलाचा हात धरुन खांद्यावर रायफल घेऊन झेब्रा क्रॉसिंग पार करत आहे. फोटोसोबत कॅप्शन लिहीले की, ‘प्रत्येक युक्रेनियन आई वंडर वुमन आहे.’असं लिहिले आहे