पुणे – पुणेकरांच्या खिशावर भर पडण्याची शक्यता आहे. पीएमपीच्या तिकिटांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. पीएमपी बस सेवा तोट्यात सुरु आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी तिकिटांच्या दरात वाढ केली जाणार आहे. ही वाढ ग्रामीण भागातील तिकीटदरात केली जाणार असल्याचे कळाले आहे. रोजचा 70 रुपयांचा पासही बंद केला जाणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातील तिकीटाचे दर हे एसटी बस प्रमाणे होणार आहे.
पुणे शहरात तीन दिवसांपुर्वी मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेवेचे उद्घाटन केले आहे. यावेळी मोदी यांनी सर्वांनीच जास्तीत जास्त सार्वजनिक वाहणांचा वापर करण्याचे आवाहने केले आहे. एकीकडे सार्वजनिक वापर करण्याचे आवाहन केले जाते तर दुसरीकडे तिकिटांच्या दरात वाढ केली जात. याचा फटका मात्र सामान्य नागरिकांना बसतो.