वाल्हे- जागतिक योगदिनाच्या निमित्ताने वाल्हे (ता.पुरंदर) येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावरती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टंसिंग ठेऊन योगांची प्रात्यक्षिके करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, सुकलवाडीच्या सरपंच जयश्री चव्हाण,पोपट पवार, प्रा.संतोष नवले, पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार, चंद्रशेखर दुर्गाडे, सुरेखा भुजबळ, संदेश पवार, पोलिस हवालदार हनुमंत गार्डी, बी.व्ही.जगदाळे, दादा म्हेञे, दिपक कुमठेकर, आकाश भुजबळ आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ.दुर्गाडे म्हणाले, “शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी योगसाधना महत्वपूर्ण ठरते. तसेच संघर्ष, ताणतणाव आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरीराला निरोगी आणि मनाला शांत राखण्याचे काम योगाच्या माध्यमातून होईल, अशी आशा आहे”. असे मत याप्रसंगी प्रा.डॉ.दुर्गाडे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, योगसाधनासाठी येथील महेंद्र भुजबळ, पवन दुर्गाडे, संतोष दुर्गाडे,अतुल गायकवाड आदिंनी परिश्रम घेतले. नवनाथ मदने यांनी योगप्रात्यक्षिक सादर केले.