सासवडमधील 124 अपंग कुटुंबीयांना मदतीचा हात : करोनाबाबत जनजागृती
सासवड – करोनामुळे सासवडमधील अपंग, निराधार कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. ही बाब लक्षात घेऊन पुण्यातील सुप्रसिद्ध येवले अमृततुल्य संचलित येवले फाउंडेशनच्या माध्यमातून सासवड येथील 124 हातावर पोट असणाऱ्या अपंग कुटुंबीयांना घरगुती जीवनावश्यक किराणा मालाचे वाटप केले. त्याचबरोबर करोनाबाबात जनजागृती करीत एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
यावेळी पुरंदर तालुका तहसीलदार रूपाली सरनोबत, पंचायत समिती गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक, येवले अमृततुल्यचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ येवले, निलेश येवले, प्रहार अपंग क्रांतीचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव, महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा ढवळे, योगेश बनकर, राजू निरगुडे, फाउंडेशनचे स्वयंसेवक विजय येवले, पप्पु येवले, दत्ता येवले, दीपक येवले, अशोक येवले, गणेश येवले, मोतीराम येवले, राहुल काळे तसेच अपंग बांधव आणि फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तहसीलदार रूपाली सरनोबत म्हणाल्या की , येवले फाउंडेशनच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी लक्षात घेत लॉकडाऊन काळात पुरंदर तालुक्यात 30 हजार मास्क, 20 हजार सॅनिटाझर आणि 1500 गोरगरीब, अपंग कुटुंबीयांना अन्य धान्य किट पहिल्या टप्यात वाटप करण्यात आले होते. तसेच गावात निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात आली.तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, सासवड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटाझजर, क्रिमरोल यांचे वाटप करण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
- करोनाशी लढण्याची सर्वांची जबाबदारी असून सर्वांनी शासनाने निर्देश दिलेल्या आदेशाचे पालन करावे, तसेच गरज नसेल तर घराबाहेर पडू नका.
– नवनाथ येवले, संस्थापक अध्यक्ष, येवले अमृततुल्य व फाउंडेशन